आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharukh, Anurag, Ranbeer In 'bhoothnath Returns'

'भूतनाथ रिटर्न्‍स'मध्ये अनुराग, रणबीर, शाहरुख दिसणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान 'भूतनाथ'प्रमाणे लवकरच प्रदर्शित होत असलेल्या याच्या सिक्वलमध्येही बंकू नावाच्या लहान मुलाच्या
वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात रणबीर कपूर आणि अनुराग कश्यप यांच्यादेखील भूमिका असतील. 'बॉम्बे वेलवेट'मधील रणबीर व दिग्दर्शक अनुराग 'भूतनाथ रिटर्न्‍स'मध्ये महत्त्वाच्या वळणावर प्रवेश करतात. दोघेही या सिनेमात स्वत:च्या नावाने आणि भूमिकेत दिसणार आहेत.
जेव्हा कथेत भूतनाथ निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतो, तेव्हा त्यांची एंट्री होते. तथापि, हा सिनेमा देशातील सद्य:स्थितीनुसार निवडणुकांवर आधारित आहे. भूतनाथप्रमाणेच हा सिनेमाही बाल प्रेक्षकांना खूप आवडेल, असा दावा निर्मात्यांनी केला आहे. सिनेमाची बहुतांश शूटिंग मुंबईच्या वेगवेगळ्या भागांत आणि लंडनमध्ये झाली आहे.