आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharukh Khan Very Beliver; Dipika Padukone Remark

शाहरुख खान अतिविश्वासू; दीपिका पदुकोणचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता शाहरुख खान वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावर अतिशय विश्वासू व्यक्ती असल्याचे मत अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने व्यक्त केले आहे. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केल्यानंतर सहा वर्षांनंतर ती पुन्हा एकदा शाहरुखसोबत ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे.


दीपिका म्हणाली, शाहरुखसोबत ‘ओम शांती ओम’ चित्रपट करणे माझे सौभाग्य होते. तेव्हापासून आमच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्यास मिळाल्याने आनंद होत आहे. तो वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावर एकदम विश्वासू आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या चित्रीकरणादरम्यान आम्ही खूप धमाल केल्याचे तिने सांगितले. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात दीपिकाने डबल रोल साकारला होता. यानंतर तिच्या करिअरला ख-या अर्थाने सुरुवात झाली. यानंतर तिने अनेक हिट चित्रपट दिले. अभिनेता रणबीर कपूरसोबत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करत 100 कोटींचा पल्ला गाठला आहे. येणा-या काही दिवसांत हा चित्रपट 200 कोटींची कमाई करेल, असे वितरकांना वाटत आहे. दीपिकाकडे सध्या ‘रामलीला’ आणि ‘फायंडिंग फनी’ हे चित्रपट आहेत.


रणवीरसोबत ‘रामलीला’
दीपिका सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’त काम करत आहे. प्रेमकथा असलेल्या या चित्रपटात ती रणवीरसिंगसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. रणवीर हा दर्जेदार अभिनेता असल्याचे तिने सांगितले.