आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL: बघा चॉकलेट हीरो शशी कपूर यांची न बघितलेली काही खास छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938ला कोलकाता येथे झाला. त्यांचे खरे नाव 'बलबीर राज कपूर' आहे. शशी कपूर हे रोमँटिक भूमिकांसाठी ओळखल्या जाणा-या अभिनेत्यांच्या यादीत सामील आहेत. त्यांनी तीन दशक रोमँटिक भूमिका साकारून सिनेमा प्रेमींचे भरपूर मनोरंजन केले. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर, भाऊ राज कपूर आणि शम्मी कपूर हे फिल्म इंडस्ट्रीचे सुप्रसिध्द कलाकार आहेत.
शशी यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईच्या 'डॉन बास्को स्कुल'मधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अनेक धार्मिक सिनेमांमध्ये बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या. शशी यांचा मोठा भाऊ राज कपूर यांनी त्यांना 'आग' (1948) आणि 'आवारा' (1951)या सिनेमांमध्ये भूमिका दिल्या होत्या. शशी यांनी एक अभिनेता म्हणून करिअरची सुरूवात 1961मध्ये यश चोप्रा यांच्या 'धर्म पुत्र' या सिनेमामधून केली. शशी यांनी जवळपास 200 सिनेमांमध्ये काम केले आहे.
90च्या दशकात प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी सिनेमांमध्ये काम करणे बंद केले. 1998मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जिन्ना' हा त्यांच्या करिअरमधील शेवटचा सिनेमा होता. त्यामध्ये त्यांनी सुत्रधारची भूमिका साकारली होती. 1958मध्ये शशी हे 20 वर्षांच्या वयात जेनिफर कॅण्डलसोबत लग्न गाठीत अडकले होते. त्यांचे लग्न पृथ्वीराज कपूर यांच्या मुंबईच्या 'मटुंगा फ्लॅट'मध्ये झाले होते. शशी यांना कुणाल, करण आणि संजना हे तीन मुले आहेत. त्यांना फिल्मफेअर 'लाइफ टाइम अचीव्हमेंट पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले होते. भारत सरकार ने 2011मध्ये त्यांना पद्य भूषण पुरस्काने सन्मानित केले होते.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शशी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची बालपणापासून ते आतापर्यंतचे काही छायाचित्रे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा शशी यांची काही खास छायाचित्रे...