आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'सट्टेबाज' राज कुंद्राची पत्नी पूर्वी दिसायची अशी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बाजीगर' आणि 'धडकन' यांसारख्या सिनेमांमुळे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या वयाची 38 वर्षे पूर्ण केली आहेत. अर्थातच शिल्पा आज (8 जून) आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांत चाळीसहून अधिक सिनेमांमध्ये झळकलेल्या शिल्पाचा जन्म 8 जून 1975 रोजी कर्नाटकमधील मंगळूरुमध्ये झाला होता.
शिल्पासाठी 2007 हे वर्ष खूप महत्त्वाचे ठरलं होतं. याच वर्षी 'बिग ब्रदर' या ब्रिटिश रिअ‍ॅलिटी शोची शिल्पा विजेती ठरली होती. या शोमध्ये वर्णभेदामुळे शिल्पा चर्चेत आली होती. त्यानंतर 'लाईफ इन ए मेट्रो' या सिनेमातील अभिनयसाठी प्रेक्षकांसह समीक्षकांनीही शिल्पाचे कौतुक केले होते.
बघा शिल्पाची काही खास छायाचित्रे...