आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शायनी आहुजाला मिळाला पासपोर्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शायनी आहुजाला पासपोर्ट मिळाल्याने अनिस बज्मी यांच्या ‘वेलकम बॅक’च्या शूटिंगसाठी दुबईला जाण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बलात्कार प्रकरणात अडकलेल्या शायनी आहुजाने ‘वेलकम बॅक’ साइन केल्याचे कळते. मात्र, त्याच्यावर परदेशात शुटिंगला जाण्यास बंदी घालण्यात आली होती. कारण त्याच्याकडे परवानगी नव्हती. शायनीला जामीन मिळाला असला, तरी त्याच्या हालचालींवर मर्यादा घातल्या होत्या. शिवाय त्याचा पासपोर्टदेखील जप्त करण्यात आला होता. आई-वडिलांना भेटण्यासाठीही त्याला परवानगी घ्यावी लागत होती. मात्र, ताज्या घटनाक्रमानुसार, आता तो शटिंगसाठी परदेशात जाऊ शकतो. सिनेमाचे दिग्दर्शक अनिस बज्मी यांनी या वृत्ताला अधिकृतरीत्या दुजोरा दिला आहे.
अनिस यांनी सांगितले की, ‘पासपोर्ट मिळाल्याचे शायनीनेच आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे दुबईमध्ये ‘वेलकम बॅक’च्या शुटिंगमध्ये सहभागी होण्यास त्याला कोणतीही अडचण येणार नाही, असे वाटते. जेव्हा तो गुरू महेश भट्ट यांच्याकडे काम मागायला गेला होता तेव्हाच त्याची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. खरे तर मी त्याला यापूर्वी कधी भेटलो नव्हतो. मात्र, त्याचा एकटेपणा मी समजू शकतो. त्यानंतर मी त्याचा शोध घेऊन सिनेमात त्याला संधी दिली.’