आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन \'शोले 3D\' जानेवारीत, 250 लोकांच्या टीमची मेहनत फळाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेला ‘शोले’ चित्रपट आता नव्या थ्री-डी रूपात सादर होणार आहे. होळीचे रंग चित्रपटगृहातच उधळत असल्याची जाणीव होईल. बंदुकीच्या गोळ्या आजूबाजूंनी सुसाट वेगाने निघून जातील. डॉल्बी डिजिटलमध्ये गब्बरची गर्जना मागून, तर ठाकूरचा हुंकार समोरून येईल. थ्री-डीमध्ये रूपांतरित केला जाणारा हा देशातील पहिला चित्रपट आहे.
सहा महिन्यांपूर्वीच हा चित्रपट थ्री-डीमध्ये रूपांतरित झाला आहे. मात्र, साउंड आणि कलरवर अजूनही काम सुरू आहे. ‘भवनी भवाई’ आणि ‘मिर्च मसाला’सारखे चित्रपट देणार्‍या केतन मेहतांनी हे आव्हान स्वीकारले. ‘दिव्य मराठी’शी बोलताना ते म्हणाले, शोले चित्रपटाच्या बहुतांश प्रिंट खूप जुन्या झाल्या होत्या आणि त्यांचे रंगही फिके पडले होते. त्यामुळे हे काम खूपच कठीण होते. चित्रपटातील 2.8 लाख फ्रेम्समधील प्रत्येक फ्रेम आम्ही एखाद्या चित्रासारखी नव्याने रंगवत आहोत. मुघल-ए-आझमसारख्या ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटालाही असेच रंग दिले होते. नवा शोले 3 जानेवारीला प्रदर्शित होईल.
हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘टायटॅनिक’ आणि ‘स्टार वॉर’चे थ्री-डी व्हर्जन पाहून चित्रपट निर्माते जयंतालाल गढा यांना ही कल्पना सुचली. हे काम त्यांनी केतन मेहतांवर सोपवले. मेहता सांगतात, एखादा हिंदी चित्रपट थ्री-डीमध्ये रूपांतरित करण्याचा विचार केला, तेव्हा ‘शोले’शिवाय दुसरे नावच समोर आले नाही. दोन वर्षांपूर्वी हॉलीवूड सल्लागार फ्रेंक्स फॉस्टर यांच्या मदतीने हा प्रोजेक्ट सुरू झाला. 250 लोकांच्या टीमने सलग वर्षभर काम केले. हेमंत शिंदे आणि राम धुमणे हे टीम लीडर होते. 25 कोटी रुपये खर्च आला. एवढय़ा बजेटमध्ये एक नवा चित्रपट तयार झाला असता. त्रिमितीय परिणाम साधण्यासाठी प्रत्येक फ्रेममध्ये दिसणारी प्रत्येक वस्तू डिजिटल तंत्रज्ञानाने वेगवेगळी केली. डेफ्थ दाखवण्यासाठी वस्तूंचे तीन इम्प्रेशन तयार करण्यात आले. प्रिंट जुनी झाल्यामुळे रंग धूसर झाले होते. प्रत्येक फ्रेममध्ये सजीवपणा आणण्याचे समांतर आव्हान होते.
होळीचे गाणे रूपांतरित करणे सर्वात कठीण काम होते. विशेषत: पडद्यावर उडणारा गुलाल चित्रपटगृहात उडाल्याचा अनुभव देण्याचे आव्हान होते. त्यामुळे या भागात अँनिमेशनद्वारे काही घटक नव्याने टाकावे लागले.