आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shrikrushna International Presents Launch Music 'karle Pyar Karle'

‘करले प्यार करले’ चे म्युझीक लाँच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकृष्ण इंटरनॅशनलद्वारा प्रस्तुत ‘करले प्यार करले’ या चित्रपटाचे म्युझीक नुकतेच पुण्यात लॉंच करण्यात आले. यावेळी अभिनेता शिव दर्शन, निर्माते सुनिल दर्शन,दिग्दर्शक राजेश पांडे, राहुल भंडारी, भाऊसाहेब भोईर, रूनी खान आणि अभिनेत्री हासलिन कौर, सुभाष सणस आदी उपस्थित होते. हा चित्रपट कबीर आणि प्रीत यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे.


अतिशय निराशाजनक परिस्थितीत 8 वर्षीय कबीर प्रीतच्या प्रेमात पडतो तेव्हाच कबीर च्या हातून एक गुन्हा घडतो,
ज्यामुळे त्याला बालसुधारगृहात जाण्याची वेळ येते या बिकट परिस्थितीतुन कबीरला बाहेर काढण्यासाठी त्याची आई गाव सोडण्याचा निर्णय घेते. 12 वर्षे भटकल्या नंतर ते परत पहिल्याच गावात परत जातात , तिथे कबीर आणि प्रीत हे दोघे पुन्हा एकत्र येतात. या चित्रपटातुन शिव दर्शनच्या रूपाने बॉलिवुडमध्ये आणखी एक दिग्दर्शक पुत्र पदार्पण करत आहे. चित्रपटाला रेयान अमीन,रशीद खान, प्रशांत सिंग, सुनील दर्शन, मंम्झी, मीत ब्रोस, अंजान यांचे संगीत आहे.


सुमारे सहा वर्षा नंतर केवळ आपल्या मुलाच्या सिनेपदार्पणासाठी पुन्हा चित्रपट सृष्टीत दाखल झालेले
सुनील दर्शन यांचा मुलगा शिव दर्शन ने न्यूयॉर्क मध्ये नृत्याचे शिक्षण घेतले आहे . हसलिन कौर हिला
पहिल्यांदाच या चित्रपटाच्या रुपात नायिकेची लॉटरी लागली आहे. चित्रपटात खलनायकाच्‍या भ‍ूमिकेत रुमि खान
पदार्पन करतोय. चित्रपटाची कथा, पटकथा सुनील दर्शने यांची आहे. संवाद राकेश पांडे ,रेषू नाथ, राहुल पटेल यांचे आहेत.