आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजा चौधरीबरोबर नाते तुटल्यानंतर आता श्वेता तिवारी करतेय दुसरे लग्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस' सिझन 4 ची विजेती श्वेता तिवारीने आता दुसरा संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ती अभिनेता अभिनव कोहलीबरोबर लग्नगाठीत अडकणार आहे.
गेल्या साडे तीन वर्षांपासून अभिनव आणि श्वेता डेटिंग करत आहेत. आता त्यांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या जुलै महिन्यात हे दोघे लग्नगाठीत अडकणार आहे.
श्वेताने 'झलक दिखला जा' या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये आपल्या लग्नाबद्दल सगळ्यांना सांगितले. यावेळी अभिनव कोहली आणि तिची मुलगी पलक हजर होते.
सध्या श्वेताच्या आजोबांची प्रकृती ठिक नसल्यामुळे अद्याप लग्नाची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र लग्न उत्तर भारतीय पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.