आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गायक अमितकुमार यांचे आता ऑनलाइन म्युझिक स्टोअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - संगीतकार साजिद-वाजिद यांनी नैनों में सपना.. गाणे माझ्या आवाजात रिक्रिएट करण्यास सांगितले. मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांना किशोरकुमार यांच्याप्रमाणे गाण्याचा पोत हवा होता. नोव्हेंबर 2012 मध्ये गाणे रेकॉर्ड झाले. गाणे ऐकल्यानंतर साजिद-वाजिद अक्षरश: नाचायला लागले. वाजिद म्हणाले, अमितजी, गाना बहुत हिट होगा आणि वाजिदचे शब्द खरे ठरले. गाणे रिलीज झाले आणि ‘नैनों में सपना’वर तरुणाईने ठेका धरला. गाणे तुफान हिट झाले. संगीतकार, निर्माता, दिग्दर्शकांनी त्यांना हवा असलेला माझ्या पापांचा तो ‘किशोर टच’ ‘नैनों में’मध्ये तंतोतंत उतरल्याची दाद दिली.


आता अभिजात संगीतासाठी काम करायचे ठरवले आहे. सध्याचा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे. इंटरनेट हे नवे माध्यम झपाट्याने वाढते आहे. चांगले संगीत, आशयघन गाणी रसिकांपर्यंत नेमकी पोहोचावीत यासाठी ऑनलाइन म्युझिक स्टोअर या कन्सेप्टवर काम सुरू आहे. या ऑनलाइन स्टोअरच्या माध्यमातून अर्थपूर्ण, दर्जेदार गीत व संगीताला प्राधान्य देणार आहोत. क्रिएटिव्हिटीवर भर राहील. रसिकांना हे काम निश्चित आवडेल. मी अशा व्यावसायिक क्षेत्रात काम करतो, जेथे काही खरे नसते. हे एकदम अनअ‍ॅशुअर्ड क्षेत्र आहे. येथे खुदा मेहेरबान तो गधा पहेलवान, असे बरेचदा घडते. मी 42 वर्षे याच व्यवसायात आहे. अनेक चढ-उताराचे क्षण मी अनुभवले आहेत. त्यातून बरेच काही शिकलो आहे. शिकत आहे.


किशोरकुमार...यासम हाच
किशोरकुमार ही तर दैवी देणगी आहे. त्यांच्यासारखा गायक 10 हजार वर्षांत होणार नाही. मनाने अत्यंत चांगला माणूस आणि अद्वितीय गायक असे दुर्मिळ गुण त्यांच्यात होते. माझ्या पापांसारखा गायक पुन्हा होणे नाही.


टॅलेंटला हवी चांगल्या वागणुकीची जोड
तुम्हाला काही करून दाखवयाचे असेल तर तुमच्यात टॅलेंट असणे अत्यंत आवश्यक आहे. त्या टॅलेंटला चांगल्या वागणुकीची जोड दिल्यास यश नक्कीच मिळेल. त्याला नशिबाचीही साथ हवीच. माझ्या मुलीलाही मी हेच सांगतो.


अमितकुमार यांची गाजलेली गाणी
०बडे अच्छे लगते हैं(बालिका वधू) ०तेरी याद आ रही है (लव्ह स्टोरी) ०देखो मैने देखा है एक सपना (लव्ह स्टोरी) ०ये जमीं गा रही है(तेरी कसम) ०एक दो तीन (तेजाब) ०कहदो के तुम हो मेरी (तेजाब) ०तिरछी टोपीवाले (त्रिदेव) ०बॉम्बे शहर हादसों का (हादसा)