आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या सुमधूर आवाजाने दुस-यांचा आजार दूर करायचे मुकेश, बघा RARE PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपटसृष्टीच्या कृष्णधवल जमान्यात आपल्या अप्रतिम आवाजाने गाण्यात रंग भरणारे गायक मुकेश यांची आज (22 जुलै) जयंती आहे. मुकेश म्हणजे निष्पाप, मधुर व खिन्न स्वरांचा उत्कृष्ट मिलाफच. त्यांनी गायलेल्या विरहगीतांनी आजच्या तरुण पिढीच्या डोळ्यांत टचकन पाणी येते, यावरूनच मुकेश यांच्या गायनाची प्रचिती येते.

22 जुलै 1923 रोजी दिल्लीत जन्मलेल्या मुकेश यांचे संपूर्ण नाव मुकेश चंद माथुर असे होते. संगीताचे, गायकीचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले. ते गायक-अभिनेता कुंदनलाल सहगल यांचे मोठे प्रशंसक होते आणि त्यांच्याप्रमाणेच गायक अभिनेता बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. मुकेश यांनी दहावीपर्यंतच शिक्षण घेतले आणि त्यानंतर आपले संपूर्ण लक्ष गायनाकडे केंद्रित केले.मुकेश आपल्या खासगी आयुष्यात खूपच संवेदशनशील व्यक्ति होते. इतरांचे दुःख, व्यथा समजून त्या दूर करण्याचा ते नेहमीच प्रयत्न करायचे.

मुकेश यांच्या आवाजाची जादू काय होती याची प्रचिती येणारी ही एक घटना. अडीच-तीन वर्षांची एक मुलगी हॉस्पिटलमध्ये बेशुद्धावस्थेत होती. वैद्यकीय उपचारांना ती प्रतिसाद देत नव्हती. मुलीच्या आईवडिलांनी हळू आवाजात ट्रान्झिस्टर लावला होता. इतर गायकांची काही गाणी झाल्यावर मुकेश यांचे गाणे लागले. ती मुलगी डोळे किलकिले करून पाहू लागली. काही खाणाखुणा करू लागली. गाणे संपल्यावर मुलगी पुन्हा बेशुद्ध झाली. हा प्रकार चार-पाच वेळा घडला. मुकेश यांच्या गाण्याच्या वेळीच हा प्रकार होतो, हे तिच्या आईवडिलांच्या लक्षात आले. त्यांच्या दृष्टीने मुलीचे आयुष्य महत्त्वाचे होते. ते धारिष्ट्य करून मुकेश यांना भेटले. घडलेला प्रकार सांगितला आणि विनंती केली की, त्यांनी मुलीला एकदा तरी भेटावे. एवढा महान कलाकार, पण मीपणा अजिबात नव्हता. त्यांनी लगेचच मुलीची भेट घेतली. शिवाय जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळत असे, तेव्हा ते मुलीला भेटायला जात आणि एखादे गाणे गात असे.

मुकेश यांची दुर्मिळ छायाचित्रे बघण्यासाठी आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...