आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यदिनी येणार ‘सिंघम-2’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘आली रे आली आता तुझी बारी आली’, ‘जिसमे है दम वो है बाजीराव सिंघम’ अशा डायलॉगने बॉलीवूडमधील 2011 चे वर्ष अजय देवगणने आपल्या नावावर केले होते. पहिल्या चित्रपटातील डायलॉग, मारधाड, दर्जेदार गाणी पुन्हा एकदा ‘सिंघम-2’मधून प्रेक्षकांना येत्या स्वातंत्र्यदिनी अनुभवता येणार आहे.
सिंघमच्या दुस-या भागात पहिल्या चित्रपटातील बहुतांश कलाकार राहण्याची शक्यता आहे. बोलबच्चन या चित्रपटाला हिमेश रेशमियाने संगीत दिले होते. त्यामुळे सिंघम-2 मध्ये हिमेश पुन्हा एकदा गाणी संगीतबद्ध करणार आहे. पहिल्या चित्रपटातील अभिनेत्री काजल अग्रवालच्या जागी आता करिना कपूरचा सिक्वेलमध्ये समावेश केला जाणार आहे.
प्रकाश राजच व्हिलन!
‘सिंघम’मध्ये अजयच्या तोडीस तोड प्रकाश राज याने जयकांत शिर्केच्या भूमिकेत दमदार अभिनय केला होता. संवादफेक, विनोद सर्वच पातळ्यांवर तो सरस ठरला होता. त्यामुळे आता दुस-या भागात तोच खलनायक राहील की त्याच्या जागी दुसरा कोणी येईल, हे अजून गुलदस्त्यातच आहे.