आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का जरा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


करीना कपूरने बॉलिवूडमध्ये सुरू केलेला ‘जीरो साइज'चा फंडा आता प्रत्येक अभिनेत्री प्रत्यक्षात उतरवताना दिसत आहे. ‘बिजली’सुद्धा याच कॅटेगरीत सामील झाली आहे.

‘रब ने बना दी जोडी’ या सिनेमात जाड-जूड चेहर्‍याची अनुष्का शर्मा सध्या सडपातळ दिसत आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या ‘मटरू की बिजली का मंडोला’मध्ये ती खूपच बारीक झालेली दिसली. जीरो फिगरमध्ये राहण्यासाठी अनुष्का इतकी बारीक झालीय की ती लवकरच ‘वीक’ कॅटेगरीमध्ये मोडली जाऊ शकते. ती इतकी बारीक झाली की, तिच्या चेहर्‍यावर चमक दिसत नाही. मात्र अनुष्का म्हणते की, मी कधीच जीरो साइजची इच्छा ठेवत नाही. त्यामुळे इतके म्हणावे वाटते की, ‘अनुष्का आपल्या तब्येतीकडे लक्ष दे नाहीतर आजारी पडशील.