आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या स्टार्सच्या अशा Scandalsविषयी ज्यामुळे बॉलिवूड झाले अपमानित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री गीतिका त्यागीने सिनेमा दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. त्यांनी त्यांच्या टि्वटर अकाउंटवर एक व्हिडिओ अपलोड केला. त्यामध्ये सुभाष कपूर गीतिकासोबत अश्लिल भाषेचा संवाद करत आहेत. कपूर म्हणतात, आमच्यामध्ये जे काही झाले आहे ती खूपच लाजीरवाणी बाब आहे. दोघांनाही याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. गीतिकाने 'वन बाय टू' आणि 'व्हीट द फिश' या सिनेमांमध्ये काम केले असून सुभाष कपूर यांनी 'जॉली एलएलबी' आणि 'फंस गए रे ओबामा'सारख्या कॉमेडी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. या व्हिडिओमध्ये सुभाष यांची पत्नी आणि दिग्दर्शक अतुल सबरवालदेखील उपस्थित आहेत. या संवादाच्या वेळी गीतिका रडत होती आणि तिने सुभाष कपूर यांच्या कानशिलातही लगावली होती.
गीतिकाचा मित्र पटकथा लेखक दानिश रजाने सांगितले, 'ही घटना दोन वर्षांपूर्वीचे आहे. गीतिकाच्या एका मित्राच्या येथे पार्टी होती. सुभाष यांनी खूप मद्यपान केले होते आणि ते नशेत धुंद झाले होते. जेव्हा मी पार्टीतून घरी निघालो तेव्हा मी गीतिकाला सुभाष यांना उठवण्यास सांगितले. तिने मला सांगितले, की तू जा मी त्यांची काळजी घेईन. दुस-या दिवशी जेव्हा माझी आणि गीतिकाची भेट झाली तेव्हा तिने सांगितले, की रात्री सुभाष खूप भावूक झाले होते आणि आम्ही एकमेकांना किस केले.'
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडसारख्या मोठ्या इंडस्ट्रीला मान खाली घालावी लागली आहे. परंतु ही पहिली घटना नाहीये ज्यामुळे बॉलिवूड अपमानित झाले आहे. यापूर्वीही अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत ज्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप लावल्या गेले आहेत. मधुर भंडारकर, शक्ती कपूर, शायनी आहुजा, अमन वर्मा आणि अमरसिंह यांच्यासारखे अनेक स्टार्स सेक्स स्कँडलमध्ये अडकले आहेत.
बॉलिवूडच्या स्टार्सच्या सेक्स स्कँडल प्रकरणांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...