आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Slimmer Sonkshi Sinha Turns A Stunner In A Double Slit Gown At Art Event

सोनाक्षी स्लिम बॉडीसाठी सलमानकडून घेतेय टीप्स, पाहा किती कमी केले वजन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर एकेकाळी तिच्या वाढलेल्या वजनामुळे टिका होत होती. बॉलिवूडच्या इतर अभिनेत्री त्यांच्या शरीराची खास काळजी घेतात. परंतु सोनाक्षी यापूर्वी तिच्या फिगरविषयी कधीच गंभीर झालेली दिसली नाही. परंतु सध्या तिच्याकडे बघून जाणवते, की ती तिच्या फिगरविषयी आता विचार करायला लागली आहे.
5 फेब्रुवारीला मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी सोनाक्षी सिन्हाला आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ती पहिल्यापेक्षा खूपच स्लिम दिसत होती. या कार्यक्रमात तिने स्लीक ब्लॅक गाउन परिधान केला होता. छायाचित्रांमध्ये सोनाक्षीच्या रुपात पुर्वीपेक्षा आता झालेला बदल स्पष्ट दिसतोय.
रंजक गोष्ट म्हणजे, सोनाक्षी वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी स्लिम करण्यासाठी सलमान खानकडून टीप्स घेत आहे. आता तिच्याकडे बघून असे जाणवते, की सलमानच्या टीप्सचा सोनाक्षीला खूपच फायदा झालेला दिसतो. सोनाक्षीने स्लीक गाउन परिधान केल्याने तिच्या बॉडीवर कुठेच एक्स्ट्रा चरबी दिसत नव्हती.
सोनाक्षी नीरज गोस्वामीच्या आर्ट कार्यक्रमामध्ये गेली होती. परंतु तिथे तिने तब्बल दोन तासानंतर उपस्थिती लावली होती. तिने उशीरा हजेरी लावल्याचे कोणलाच वाईट वाटले नाही. एवढेच नाही तर, तिने त्या कार्यक्रमात स्वत:च्या हाताने एक चेह-याचे चित्र देखील काढले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा सोनाक्षी सिन्हाची या कार्यक्रमातील काही छायाचित्रे आणि तुम्हीच पाहा सोनाक्षीने किती वजन केले कमी...