आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sofia Hayat And Other Actresses In Transperent Dresses

PHOTOS : बी टाऊनच्या अभिनेत्रींची ही फॅशन की पब्लिसिटी स्टंट ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉडेल आणि अभिनेत्री असेलली सोफिया हयात नेहमीच आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. कधी मीडियासमोर बिकिनी फोटोशूट करुन आपला वाढदिवस साजरा करणे असो, किंवा ट्विटरवर टॉपलेस फोटो अपलोड करणे असो, सोफिया नेहमीच लाईमलाईटमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असते. शिवाय उत्तेजक कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावणे, हेसुद्धा सोफियाचे वैशिष्ट्य आहे.

हे आम्ही यासाठी म्हणतोय कारण अलीकडेच सोफिया एमटीव्ही व्हिडिओ म्युझिक अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर अवतरली होती. रेड कार्पेटवर सोफिया चक्क चक्क ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसली.

सध्याच्या काळात बॉलिवूडमध्ये ट्रान्सपरंट ड्रेसची चलती असल्याचे मान्य आहे. मात्र सोफियाचा अवतार कुणीलाही आश्चर्यचकित करणारा होता. आता एवढा ट्रान्सपरंट ड्रेस ही खरंच बॉलिवूडमधील नवीन फॅशन आहे की प्रसिद्धी मिळवण्याचा सोपा मार्ग हे तर सोफियाला ठाऊक. मात्र अशा प्रकारचा अवतार करुन उपस्थितांच्या नजरा आपसुकच तिच्याकडे वळल्या हेही तितकेच खरे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ट्रान्सपरंट ड्रेसेसचा ट्रेंड डोळे झाकून फॉलो करणा-या बी टाऊनच्या आणखी काही अभिनेत्रींची छायाचित्रे...