आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 10व्या वर्षी काकानेच केला होता बलात्कार, स्वतःला सावरुन यशोशिखरावर पोहोचली सोफिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका अशी स्वतःची ओळख निर्माण करणारी आणि सध्या बिग बॉसच्या घरात राहून प्रसिद्धी मिळवणारी सोफिया हयात आज (6 डिसेंबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. 6 डिसेंबर 1984 रोजी सोफियाचा जन्म झाला होता. सोफियाची आई भारतीय तर वडील पाकिस्तानी आहेत. लंडनमध्ये सोफियाचे बालपण गेले. सोफियाने अर्धा डझनपेक्षा जास्त ब्रिटिश सिनेमे आणि टीव्ही सीरिअल्समध्ये काम केले आहे. सध्या सोफिया बिग बॉस या शोमधून प्रसिद्धीझोतात आली आहे.
खरं तर सोफिया हयात सर्वसामान्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. कारण सोफियाच्या भूतकाळात एक मन हेलावून टाकणारी घटना तिच्यासोबत घडली होती. बालपणी सोफियाचे लैंगिक शोषण झाले होते. ही गोष्ट स्वतः सोफियाने सांगितली.
याविषयी सोफियाने सांगितले, की बालपणी तिच्या काकानेच तिच्यावर बलात्कार केला होता. त्यावेळी ती दहा वर्षांची होती. याविषयी तिने आपल्या आईला सांगितले, मात्र तिच्या आईने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता.
सोफियाचा जन्म एका पारंपरिक मुस्लिम कुटुंबात झाला होता. बलात्काराच्या घटनेनंतर तिला कुणाचीही साथ मिळाली नव्हती. शिवाय आर्थिकदृष्ट्यासुद्धा तिला पाठबळ मिळालं नव्हतं.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये पाहा सोफियाचा हटके अंदाज...