आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST LOOK: 'हिम्मतवाला'मध्ये दिसणार सोनाक्षीचा रेट्रो अंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा आगामी 'हिम्मतवाला' या सिनेमात परवीन बाबी आणि श्रीदेवी यांची कॉपी करताना दिसणार आहे. 'हिम्मतवाला' या सिनेमात सोनाक्षी 80च्या दशकातील प्रसिद्ध चमड्याची पँट आणि भडक कपड्यात दिसणार आहे.

सोनाक्षीचा हा लूक डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केला आहे. 'हिम्मतवाला'मध्ये सोनाक्षी स्पेशल अपिअरन्समध्ये दिसणार असून तिच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्याचे शब्द 'थँक गॉड इट्स राईट...' असे आहेत. हे गाणे कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश यांनी कोरिओग्राफ केले आहे.

आपल्या या लूकविषयी सोनाक्षीने सांगितले की, ''मनीषने माझ्यासाठी खूप चांगले काम केले आहे. मला हा लूक खूप आवडला. या गाण्याचे शुटिंग करण्यापूर्वी मी परवीन बाबी आणि श्रीदेवी यांच्या गाण्याचे व्हिडिओ बघितले होते.''

या गाण्यात सोनाक्षीचे दोन लूक आहेत. त्यापैकी एक लूक 'शान' सिनेमातील 'प्यार करने वाले...' या गाण्यातील परवीन बाबीच्या लूकसारखा आहे. यामध्ये तिने गोल्डन रंगाचा गाऊन परिधान केला आहेत. तर दुसरा लूक श्रीदेवीच्या 'चालबाज' सिनेमातील लूकसारखा आहे. यामध्ये सोनाक्षीने काळ्या रंगाची पँट, जॅकेट आणि बुट्स घातले आहेत. सोनाक्षीचा हा लूक नुकताच रिव्हील करण्यात आला असून रेट्रो लूकमध्ये सोनाक्षी सुंदर दिसत आहे.

'हिम्मतवाला' हा सिनेमा 1983 मध्ये रिलीज झालेल्या आणि जितेंद्र-श्रीदेवीची प्रमुख भूमिका असलेल्या 'हिम्मतवाला'चा रिमेक आहे. या सिनेमात अजय देवगण आणि तमन्ना प्रमुख भूमिकेत आहेत. येत्या 29 मार्चला हा सिनेमा रिलीज होतोय.

सोनाक्षीचा दुसरा लूक बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...