आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मूनवॉक करताना दिसेल सोनाक्षी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ओह माय गॉड’ या सिनेमात ‘गो गो गोविंदा’ गाण्यासाठी प्रभुदेवाकडून धडे घेणारी सोनाक्षीने आता ‘हिम्मतवाला’मधील एका डिस्को गाण्यासाठी साजिद खानकडून धडे घेतले. या गाण्यात सोनाक्षी मायकल जॅक्सनची प्रसिद्ध नृत्यशैली ‘मूनवॉक’ करताना दिसणार आहे.

या सिनेमातील ‘थँक गॉड इट्स फ्रायडे’ या गाण्यात सोनाक्षीने मूनवॉक केला आहे. कोरियोग्राफर फराह खानचा भाऊ साजिद खानने सोनाक्षीला मूनवॉकच्या टिप्स दिल्या.

झाले असे की, फराह खान सोनाक्षीला गाण्यावर नृत्य शिकवत होती. मात्र सोनाक्षीला स्टेप्स जमत नव्हत्या. त्यामुळे साजिद स्वत: डान्सफ्लोरवर आला आणि सोनाक्षीला स्टेप्स शिकवल्या. साजीद एक चांगला नर्तक आहे. शालेय जीवनात त्याने अनेक नृत्य स्पर्धा जिंकल्या आहेत.

श्रीदेवी आणि जितेंद्र यांचा 1983 मध्ये आलेल्या सुपरहिट रिमेकमध्ये अजय देवगण आणि तमन्ना मुख्य भूमिकेत आहेत. रॉनी स्क्रूवाला आणि वाशू भगनानी यांच्या सहनिर्मितीत बनलेला हा सिनेमा 29 मार्चला प्रदर्शित होणार आहे.