आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा रणवीरमुळे सोनाक्षी सेट सोडून जाते...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘लुटेरा’ सिनेमाच्या शूटिंगवेळी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आपल्या सह अभिनेत्याच्या एका गोष्टीमुळे इतकी चिडली होती की ती सेट सोडून बाहेर गेली. सिनेमातील अभिनेता रणवीर सिंहने एका मुलाखतीत चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी सांगितल्या.

रणवीर म्हणाला की, एका दृश्यात मला सोनाक्षीला घट्ट पकडून ओरडून म्हणायचे होते की, ‘तुमने पुलिस को बुलाया’. त्यावेळी मी पात्रात बुडालो होतो. जितक्या वेळेस मी संवाद बोललो तेव्हा माझ्या तोंडातून थुंका उडून सोनाक्षीच्या तोंडावर उडाला. एकदा झाल्यावर तिने काही म्हटले नाही. मात्र दुसर्‍यांदा सांगूनही असेच घडल्यावर ती रागावली आणि सेट सोडून निघून गेली. त्यानंतर तिला परत आणण्यासाठी मला तिची खूप मनधरणी करावी लागली. तरीसुद्धा ती ऐकत नव्हती त्यामुळे शूटिंग मध्येच थांबवावे लागले.

'लुटेरा'च्या प्रचारासाठी आलेल्या सोनाक्षीने उत्तराखंडच्या पूरग्रस्तांना मदत करण्याची लोकांना अपील केली आहे. ती म्हणाली की, तेथील अडकलेल्या लोकांना खाण्या-पिण्याच्या आणि इतर गोष्टी महागात दिल्या जात आहेत. ही बातमी वाचून खूप दु:ख झाले. असे व्हायला नको तर सगळ्यांनी मिळून मदत करायला हवी. तिचे वडील आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पूरग्रस्त लोकांच्या पुनर्वसनासाठी 50 लाख रुपये स्वैच्छिक दान दिले आहेत.