आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonakshi Sinha Arjun Kapoor Play Holi On Tevar Shot

सोनाक्षीचे \'तेवर\', अर्जुनसोबत छतावर खेळली होळी, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा: होळीचा सण नुकताच संपला आहे. परंतु 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्यावर अजूनही होळीची नशा उतरलेली दिसत नाहीये. कारण दोघांनी ताजनगरमध्ये होळीचा आनंद लुटला आहे. तेही लपूनछपून नव्हे तर सर्वांसमोर खुलेआम दोघांनी घराच्या छातावर होळी खेळली आहे. अर्जुनने सोनाक्षीला विनोदी अंदाजात गालावर काही न कळून देता रंग लावला आणि ती एकदम डचकलीच. त्यानंतर सोनाक्षीनेसुध्दा त्याला रंग लावला.
आग्र्यामध्ये हे दोघेही 'तेवर' सिनेमाची शुटिंग करत आहेत. गेल्या एक महिन्यापासून तिथे सिनेमाची शुटिंग चालू आहे. अर्जुनने आतापर्यंत अनेक शॉट्स पूर्ण केले आहेत. मंगळवारी (18 मार्च) सोनाक्षी सिन्हासुध्दा सिनेमाच्या शुटिंगसाठी तिथे पोहोचली. त्यांनी ताजच्या समोरील कटरा पुलेलमध्ये होळीचे काही दृश्य चित्रीत केले.
सोबतच, एका घराच्या छतावर होळी खेळण्याचे दृश्यदेखील शुट करण्यात आले. त्यामध्ये अर्जुन कपूर छतावर पोहोचतो आणि सोनाक्षी सिन्हा तिथे उभी असते तेवढ्यात तो तिच्या गालावर रंग लावतो ती सुरूवातीला थोडी घाबरते, परंतु त्यानंतर सोनाक्षीसुध्दा त्याला रंग लावते.
दोघांनी एकमेकांना रंग लावण्याचे अनेक शॉट्स दिलेत. या स्टार्सना बघण्यासाठी खूप गर्दी जमली होती.
पुढील सालइड्सवर क्लिक करा आणि बघा 'तेवर' सिनेमाच्या होळीचे काही शॉट्स...