आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonakshi Sinha, Bipasha Basu, Nita Ambani At Marks & Spencer Store Launch

मैदानावर सचिनला मिस करणार सोनाक्षी-बिपाशा, या शब्दांत व्यक्त केल्या भावना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत अलीकडेच मार्क्स अँड स्पेंसर कंपनीने आपले नवीन स्टोअर लाँच केले. या लाँचिंग इवेंटला बॉलिवूडमधील दोन सुंदर अभिनेत्रींनी हजेरी लावून कार्यक्रमाला चारचाँद लावले.
या दोन अभिनेत्रींची नावे आहेत बिपाशा बसू आणि सोनाक्षी सिन्हा. दोघीही स्टायलिश लूकमध्ये येथे पोहोचल्या आणि फोटोग्राफर्सना पोज देत मीडियाशी संवाद साधला. यावेळी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्या निवृत्तीवर चर्चा झाली. यावेळी दोघींनीही सचिनप्रती असलेली आत्मीयता व्यक्त केली.
दोघींनीही सचिनला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोनाक्षीने सचिनला धन्यवाद दिले. तिने म्हटले, की सचिनने संपूर्ण जगात भारतीयांची मान उंचावेल, अशी कामगिरी केली आहे.
तर बिपाशाने म्हटले, की मी आणि संपूर्ण जग सचिनला मैदानावर मिस करेल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा स्टोअर लाँचिंगची खास छायाचित्रे...