आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बालपणी अशी दिसत होती सलमानची \'रज्जो\' !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'दबंग', 'राऊडी राठौर', 'सन ऑफ सरदार' यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणुक दाखवणा-या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने 2 जूनला आपला 26 वा वाढदिवस साजरा केला. 2 जून 1987 रोजी पटनामध्ये शत्रुघ्न आणि पुनम सिन्हा यांच्या पोटी सोनाक्षीचा जन्म झाला होता. सोनाक्षीने आपल्या करिअरची सुरुवात कॉस्ट्युम डिझायनरच्या रुपात केली. 2005 साली रिलीज झालेल्या 'मेरा दिल लेके देखो' या सिनेमासाठी सोनाक्षीने पहिल्यांदा कॉस्ट्युम डिझायन केले होते.
2010 साली सोनाक्षी सलमान खानबरोबर 'दंबग' सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर झळकली. हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर मात्र सोनाक्षीने मागे वळून बघितले नाही. एकामागून एक हिट सिनेमे सोनाक्षीने बॉलिवूडला दिले.
एक नजर टाकुया सोनाक्षीच्या बालपणीच्या छायाचित्रांवर...