आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonakshi Sinha Is Upset About Lootera\'s Awards Snub!

‘लुटेरा’ला नामांकन न मिळाल्याने सोनाक्षी नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणवीर सिंहसोबत 2013 मध्ये आलेल्या ‘लुटेरा’ चित्रपटाला यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये स्थान मिळाले नसल्यामुळे सोनाक्षी सिन्हा नाराज झाली आहे. मुंबईमध्ये मंगळवारी रात्री स्क्रिन अवॉर्ड हा बॉलिवूडचा पहिला पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. तेथे चित्रपटाचा काहीही उल्लेख करण्यात आला नाही तथापि गेल्यावर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या यादीत त्याचे नाव आले होते. सोनाक्षी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत कार्यक्रमात आली होती. बुधवारी सकाळी ट्विटरवर तिने आपला राग काढला.
तिने लिहिले की, यावर्षी 'लुटेरा'ला नामांकनाच्या यादीतून बाहेर ठेवण्यात आले, त्यामुळे खूप दु:ख वाटले. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा मास्टरपीस, चालती, कविता, विश्वस्तरीय, टेक्निकली उत्तम चित्रपट अशा शब्दांनी त्याचे कौतुक करण्यात आले होते. इतकी प्रशंसा कोणत्याही चित्रपटाला नामांकित करण्यासाठी पुरेसी असते. याबरोबरच विक्रम मोटवाणीला बेस्ट डायरेक्टर, रणवीर सिंला बेस्ट अँक्टर, अमित त्रिवेदीला बेस्ट म्युझिक, शेट्टीला बेस्ट सिनेमॅटोग्राफी आणि अमिताभला बेस्ट लिरिक्ससाठी नॉमिनेट न करणे मला विचित्र वाटत आहे. त्यामुळे मी अत्यंत दु:खी झाल्याचेदेखील तिने लिहिले आहे. शिवाय विक्रम माझ्यासाठी खूप मोठा दिग्दर्शक असल्याचेही तिने लिहिले आहे.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्क्रिन अवॉर्ड सोहळ्यात क्लिक झालेली सोनाक्षीची ही काही निवडक छायाचित्रे...