आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75 लाखांचा ड्रेस परिधान करून रात्रभर सोनाक्षीने केला डान्स, अनेकदा घेतले रिटेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी रात्रभर 'तेवर' सिनेमाचे शुटिंग चालू होते. 'म्यूझिक बजेगा लाउड तो राधा नाचेगी, बोल राधे-राधे बोलो शाम-शाम...' या गाण्यावर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सहकलाकरांसोबत डान्सचा सीन पूर्ण केला. कोरिओग्राफर रेमोने या डान्ससाठी अनेकदा रिटेक घेतले, जोपर्यंत त्याच्या मनासारखा टेक मिळाला नाही तोपर्यंत या गाण्याचे शुटिंग पूर्ण होऊ शकले नाही.
लखलखत्या पांढ-या ड्रेसमध्ये सोनाक्षी खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत होती. सोनाक्षीचा हा अंदाज बघून शुटिंग बघायला आलेले तिचे चाहते तिला बघतच राहिले. सोनाक्षीला व्हॅनिटी व्हॅनमधून सेटवर आणण्यासाठी तिच्या खासगी बॉडीगार्डला बरेच परिश्रम घ्यावे लागले.
सोनाक्षीने या आयटम साँगसाठी दीड लाख रुपये मानधन घेतले आहे आणि 75 लाखांचा ड्रेस परिधान केला आहे.
संजय कपूरच्या प्रॉडक्शनमध्ये बनवला जाणा-या 'तेवर' सिनेमाचे हे गाणे सर्वात महागडे गाणे असल्याचे सांगितले जात आहे. या गाण्याचा कोरिओग्राफर रेमो डिसूझा आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत अर्जून कपूर आणि मनोज वाजपेयीसुध्दा आहेत. ते दोघेही सोनाक्षीला या गाण्यात साथ देणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सोनाक्षीच्या 75 लाखांच्या ड्रेसची छायाचित्रे आणि सोनाक्षीचा नवीन लूक...