आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेड बिकिनीत ऋषी कपूरबरोबर रोमान्स करणारी 'तिरेछे नैनोंवाली' ही अभिनेत्री गेली तरी कुठे ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडने ब-याच कलाकारांना भरभरुन दिले तर काही इथे फार काळ टिकू शकले नाही. इथे काही कलाकारांच्या यशस्वी गाथा सामान्यांसाठी आदर्श ठरल्या आहेत, तर काहींच्या अपयशाच्या कथाही इथे बघायला मिळतात. या झगमगत्या दुनियेत आपले नशीब आजमावण्यासाठी दरवर्षी असंख्य तरुणतरुणी मुंबईत दाखल होतात. पण काहींचं नशीब चमकतं तर काहींना अपयश पदरी घेऊन परतावं लागतं.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगतोय, जिचे नाव आहे सोनम. आज (2 सप्टेंबर) सोनमचा वाढदिवस आहे. याचनिमित्ताने तिचा विषय निघाला आहे. सोनम आपल्या काळातील बॉलिवूडच्या बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक होती.
मात्र ब-याच वर्षांपासून सोनमचे दर्शन मोठ्या पडद्यावर घडले नाही, शिवाय पेज थ्री पार्टींमध्येही ती कधी दिसत नाही. आज तिच्या वाढदिवसाच्यान निमित्ताने जाणून घेऊया सोनम सध्या आहे तरी कुठे...