आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam, Farhan & Milkha Singh Launch The Trailer Of Bhaag Milkha Bhaag

PHOTOS : 'भाग मिल्खा भाग'च्या म्युझिक लाँचमध्ये सोनम छा गयी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्यघटनेवर आधारित 'भाग मिल्खा भाग' या आगामी सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच पार पडला. धावपटू मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमात अभिनेता फरहान अख्तर मिल्खा सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. या म्युझिक लाँचला सिनेमाच्या टीमबरोबरच मिल्खा सिंग यांनीही हजेरी लावली होती.

यावेळी मिल्खा सिंग यांनी म्हटले की, ''माझ्या पिढीतील लोकांना माझ्याबद्दल ठाऊक आहे. मात्र आजची पिढी मला ओळखत नाही. या सिनेमाच्या माध्यमातून आजच्या पिढीला माझ्या आयुष्याबद्दल कळेल.''

या सिनेमात फरहान अख्तरबरोबर सोनम कपूर मेन लीडमध्ये आहे. सिनेमाच्या म्युझिक लाँच इवेंटमध्ये सोनम व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसली.

'भाग मिल्खा भाग' या सिनेमाचे म्युझिक लाँच आणि ट्रेलर लाँचिंगची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...