आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam Kapoor Attends Cousin's Wedding At Jodhpur

जोधपुरमध्ये झाला सोनमच्या आतेभावाचा शाही लग्नसोहळा, पाहा खास PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिचा आतेभाऊ करण सिंह कपूरच्या लग्नात सहभागी होण्यासाठी अलीकडेच जोधपुरला गेली होती. सोनम आपल्या भावाच्या लग्नासाठी एवढी उत्सुक होती, की तिने मुंबईत पार पडलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्याला अनुपस्थिती लावली.
सोनमने या लग्नातील काही छायाचित्रे आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली. करण सिंह कपूर अभिनेता अनिल कपूरचा भाचा आहे. या लग्नात सोनम कपूरचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते. याशिवाय बॉलिवूड, राजकीय आणि बिझनेस जगतातील मान्यवरही लग्नात उपस्थित होते. यामध्ये केंद्रिय मंत्री प्रफुल्ल पटेल, त्यांची पत्नी वर्षा पटेल, मुकेश अंबानी, नीता अंबानी, आनंद महेंद्रा, राहुल बजाज, विजय माल्या, त्यांच्या आई रितु माल्या यांचा समावेश होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सोनमने पोस्ट केलेली शाही लग्नाची खास छायाचित्रे...