आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बेवकूफियां'त अशा बोल्ड रुपात दिसेल सोनम, पहिल्यांदाच दिले किसींग सीन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सोनम कपूरची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री होते. गेल्या वर्षी तिचे रिलीज झालेले भाग मिल्खा भाग आणि रांझणा हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर गाजले होते. यावर्षीदेखील तिच्या हातात मोठे प्रोजेक्ट्स आहेत. त्यापैकी एका सिनेमात ती सलमान खानसह झळकणार आहे. सलमानच्या बडे भैय्या या सिनेमात तिला कास्ट करण्यात आले आहे. शिवाय बेवकूफियां या तिच्या आणखी एका सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच लाँच झाला. हा तिचा नवीन वर्षात रिलीज होणारा पहिला सिनेमा आहे. येत्या 14 मार्चला हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
या सिनेमांमधून सोनम गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही धमाका करण्यास सज्ज झाली आहे. बेवकूफियां या सिनेमात सोनम आयुष्मान खुरानासह स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे सोनम पहिल्यांदाच तिच्या चाहत्यांना बिकिनीत दर्शन देणार आहे. याशिवाय तिने आयुष्मानसह किसींग सीन्सही दिले आहेत. पडद्यावर सोनम पहिल्यांदाच किसींग सीन्स देताना दिसणार आहे.
यशराज बॅनरच्या या सिनेमाचे शुटिंग दिल्लीत झाले आहे. यशराजसोबतचा सोनमचा हा पहिलाच सिनेमा आहे. नुपुर अस्थाना याचे दिग्दर्शख आहे. तर कथा हबीब फैजल यांनी लिहिली आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सोनमच्या बोल्ड लूकची खास झलक दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 2014 या वर्षातील आपल्या पहिल्या सिनेमात किती बोल्ड दिसणारेय सोनम कपूर...