आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमने दीपिकाचा पत्ता केला कट, मिळवला सलमानचा \'बडे भैया\' सिनेमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2014 या नवीन वर्षात अभिनेत्री सोनम कपूरच्या हातात बरेच प्रोजेक्ट आहेत. तिला बॉलिवूडच्या दोन मोठ्या स्टार्ससोबत सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे. पहिला सिनेमा आहे शाहरुख खान आणि फरहान अख्तरचा 'रईस'. गुजराती डॉन आणि पोलिस अधिका-यांवर हा सिनेमा बेतलेला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन 'परजानिया' फेम दिग्दर्शक राहूल ढोलकिया करणार आहे.
सिनेमात सोनम कपूर खास भूमिकेत झळकणार आहे. फरहान अख्तरची निर्मिती कंपनी एक्सेल एन्टरटेन्मेंटने तिला 25 दिवसांचे वेळापत्रकसुध्दा दिले आहे. या सिनेमासाठी इतर अभिनेत्रींच्या नावाची चर्चा झाली नव्हती. त्यामुळे तिला हा सिनेमा कोणताही संघर्ष न करता मिळाला. परंतु सोनमला मिळालेल्या दुस-या सिनेमासाठी तिला वडिलांची मदत घ्यावी लागली आहे. कारण सुरज बडजात्यांच्या 'बडे भैया' या सिनेमासाठी आघाडीच्या अभिनेत्रींचे नाव जोडण्यात येत होते. परंतु आता सोनम कपूरला या सिनेमासाठी निवडण्यात आले आहे. हा सिनेमा दोन भावांवर आधारित आहे. ज्यामध्ये सलमान खान दुहेरी भूमिका साकारणार आहे. या सिनेमात सलमानसोबत सुरजला एक पारंपरिक चेहरा हवा होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या याविषयी अधिक माहिती. कशाप्रकारे सोनमला मिळाली ही भूमिका? या सिनेमात दीपिकाला घेण्याचा विचार केला जात होता...?