आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रिणीमुळे साइन केला ‘बेवकूफियां’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आतापर्यंत सोनम कपूरचे वडील अनिल कपूरच तिच्या चित्रपटाची निवड करत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, आता बातमी थोडी वेगळी आहे. सोनमने आपल्या मैत्रिणीमुळे ‘बेवकूफियां’ चित्रपट साइन केला आहे.
चित्रपटाची कथा प्रेमकहाणीपेक्षा आर्थिक मंदी दर्शवते. तीन वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेत मंदी पसरली होती, तेव्हा मोठय़ा पदावर असलेल्या भारतीय लोकांच्या नोकर्‍यांवर संकट उभे राहिले होते. याचा फटका बर्‍याच भारतीय कुटुंबाना बसला. या कुटुंबांपैकी दोन सोनमच्या मैत्रिणीदेखील होत्या. त्यांनीदेखील पैसा आणि कुवत पाहून लग्नासाठी होकार दिला होता. मात्र, आर्थिक मंदीमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. या घटनेच्या काही दिवसांनंतरच सोनमला यशराज फिल्म्सकडून या चित्रपटाची ऑफर मिळाली. आपल्या मैत्रिणीचे दु:ख जवळून पाहणार्‍या सोनमने चित्रपटाला होकार दिला.
सोनम मुलींना संदेश देऊ इच्छित आहे की, पैसा पाहून लग्नाला होकार देऊ नका, तर त्यात प्रेम पाहा. चित्रपटाचा हीरो आयुष्मानवरदेखील मंदीचे संकट ओढावते. मात्र, सोनम त्याला सोडत नाही.