गेल्या काही दिवसांपासून 'बेवकूफिया' या सिनेमामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री सोनम कपूर 18 मार्च रोजी एका गजल अल्बमच्या लाँचिंगला पोहोचली होती. तिथे तिच्या हस्ते हे गजल अल्बम लाँच करण्यात आले. मुंबईमध्ये सोनमने 'कुछ दिल ने कहा' हा गजल अल्बम प्रकाशित केला आहे.
'कुछ दिल ने कहा' या अल्बमसाठी उस्ताद राशिद खान, सोनू निगम, अरिजीत सिंह, कविता कृष्णमूर्ती, उस्ताद अहमद मोहम्मद हुसैन आणि अनूप जलोटा यांनी आपला आवाज दिला आहे.
यावेळी अनूप जलोटा, जावेद अलीसह अनेक प्रसिध्द स्टार्स या कार्यक्रमात पोहोचले होते. तिथे गायक जावेद अलीने एक दमदार परफॉर्मन्स दिला.
अल्बम लाँच करण्यासाठी आलेली सोनम खूपच आकर्षक लूकमध्ये दिसत होती. ती काळ्या आणि पांढ-या रंगाची साडी नेसलेली होती. तिने तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या म्यूझिक अल्बमध्ये हजेरी लावलेल्या सेलेब्सचे काही PICS...