आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनमला आवडते तेजाबची माधुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

27 वर्षीय सोनम कपूरला 80-90 च्या दशकातील चित्रपट आवडत नाहीत. कारण ते सगळेच पुरुष प्रधान चित्रपट असल्याचे ती म्हणते. त्यावेळीचे सगळेच चित्रपट पुरुष प्रधान होते. त्यामुळे मला ते चित्रपट आवडत नाहीत. त्यावेळी तारकांना काहीच करायला मिळत नव्हते. तरीसुद्धा मला यातून एक भूमिका निवडायला सांगितले तर मी ‘तेजाब’मधील माधुरी दीक्षितची भूमिका करू शकते. मला ती भूमिका फार आवडते. खरं तर त्यावेळी सोनमचे वडील अनिल कपूरने ‘तेजाब’, ‘लम्हे’, ‘मि. इंडिया’ आणि ‘बेटा’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले होते. सध्या सोनम यशराज बॅनरच्या एका नाव न ठरलेल्या चित्रपटात व्यग्र आहे. यात तिच्यासोबत आयुष्मान खुराणा दिसणार आहे.