आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनमला करायचाय पप्पांचा ‘तेजाब’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नव्वदच्या दशकात दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी अजरामर केलेला पप्पा अनिल यांचा ‘तेजाब’ हा चित्रपट आपल्याला पुन्हा करण्याची इच्छा असल्याचे अभिनेत्री सोनम कपूरने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले.


या वेळी सोनम म्हणाली, मला 80 आणि 90 च्या दशकातील चित्रपट फारसे आवडत नाहीत. मात्र याच काळात पापा अनिल आणि माधुरी दीक्षितचा ‘तेजाब’ हा चित्रपट आपल्याला मनापासून आवडतो. जर हा चित्रपट पुन्हा बनवण्यात आला तर यात मला काम करण्यास आवडेल. माधुरी आणि पापांची केमिस्ट्री या चित्रपटात एकदम
भन्नाट होती. तसेच यातील गाणीही तेवढीच लोकप्रिय होती. त्यामुळे नव्वदच्या दशकातील केवळ तेजाबने आपल्यावर मनापासून भुरळ पाडली आहे. तसेच त्याच काळातील ‘बेटा’, ‘लम्हे’ आणि ‘मिस्टर इंडिया’ हे चित्रपटही उत्तम असल्याचे तिने सांगितले. तसेच या काळात श्रीदेवी आणि अनिल यांचीही जोडी चांगली असल्याचे
तिने नमूद केले.


1988 मध्ये आलेल्या ‘तेजाब’ या चित्रपटाने तेव्हा बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. यातील मुन्ना देशमुख आणि मोहिनीचे पात्र आजही अनेकांच्या स्मरणात आहे. तसेच यातील गाणी भन्नाट लोकप्रिय झाली होती. विशेष म्हणजे ‘एक दोन तीन’ या गाण्याने माधुरी आणि अलका याज्ञिक यांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. ‘सो गया ये जहाँ’ या गाण्यानेही चंकी पांडेला नवी ओळख निर्माण करून दिली होती. या चित्रपटानंतर एन. चंद्रा यांच्या वाट्याला ‘तेजाब’ एवढा मोठा हिट चित्रपट आला नाही.


बिकिनी परिधान करणार नाही

सोनम सध्या यशराज बॅनरच्या चित्रपटात आयुष्मान खुराणासोबत काम करत आहे. एका चित्रपटात बिकिनी शॉटबद्दल मला विचारण्यात आले होते. मात्र, मला बिकिनी सूट होत नाही. त्यामुळे असा सीन मी करणार नाही. त्यामुळे यावर इतरांनी काहीही बोलणे उचित नसल्याचे ती म्हणाली.