आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी मिस इंडिया सोनू झाली 49 वर्षांची, बघा तिचा ग्लॅमरस अवतार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री सोनू वालियाचा आज वाढदिवस आहे. सोनूचा जन्म 19 फेब्रुवारी 1984मध्ये झाला. सोनूचे वडील भारतीय सेनेचे अधिकारी होते. तिने तिच्या करिअरची सुरूवात एक म़ॉडेलच्या रुपात सुरू केले होते. तिने पदवी शिक्षण सायकोलॉजीमध्ये पूर्ण केले असून ती एक जर्नालिझमची विद्यार्थिनी आहे. सोनूने 1985मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि ती त्यात विजेती ठरली. त्यानंतर तिला अनेक मलिका आणि सिनेमांच्या ऑफर आल्या. तिने 'बेताल पच्चीसी' या मालिकेमध्ये काम केले होते. सोनूने काही प्रसिध्द सिनेमात तिचा दमदार अभिनयही प्रेक्षकांना दाखवला 'खून भरी मांग', 'अपना देश पराये लोग', 'दिल आशना है' या सिनेमांत तिने दमदार अभिनय देऊन स्वत:ला सिध्द केले होते. 'खून भरी मांग' सिनेमासाठी उत्कृष्ट सहकलाकार म्हणून तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. परंतु बी ग्रेड सिनेमांत अंगप्रदर्शन केल्याने तिच्यावर त्यावेळी बरीच टिका झाली होती.
सिनेमांमध्ये प्रसिध्दी मिळवल्यानंतर तिने सूर्य प्रकाशसिंह नावाच्या एका एनआरआयसोबत लग्न करून स्वत:चा संसार थाटला. त्यापूर्वी तिचे कबीर बेदीसोबत बरेच दिवस अफेअरही होते. सोनूने लग्नानंतर बॉलिवूडमधून एक्झिट घेतली आणि त्यानंतचर ती कोणत्याच सिनेमात दिसली नाही.
आज तिच्या बर्थडे निमित्त आम्ही तुम्हाला तिचा ग्लॅमर अंदाजत दाखवत आहोत... पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सोनूचे काही हॉट फोटो...