आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूरज पांचोलीच्या अडचणीत वाढ, कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री जिया खान आत्‍महत्‍या प्रकरणातील आरोपी सूरज पांचोलीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. गर्भपातानंतर जिया खान खूप निराश झाली होती, असे सूरजवर दाखल करण्यात आलेल्या खटल्यात म्हटले गेले आहे.
सूरज पांचोलीने शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळे जिया खानने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचललले होते. या संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकून सेशन कोर्टाने सूरजचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
सूरज पांचोली अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आहे. जिया खान आत्महत्या प्रकरणी त्याला 10 जून रोजी अटक करण्यात आली होती. पोलिसांना तपासावेळी जिया खानची सुसाईड नोट मिळाली आहे. त्या सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनी सूरजला अटक केली होती.
कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, एफआयआर आणि पोलिस चौकशीत आरोपी सूरज जियाबरोबर गैरवर्तन करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सूरजचा जामीन मंजूर केला जाऊ शकत नाही.
कोर्टाच्या मते, गर्भपातामुळे जियाला मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तिने आत्महत्या केली.