आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेशल छब्बीस : रिअल लाइफ टू रील लाइफ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अनेक सिनेमे सत्य घटनांवर आधारित असतात किंवा एखाद्या सत्यघटनेभोवती कथेची गुंफण केली जाते. अक्षय कुमार याच्या ‘स्पेशल छब्बीस’ या सिनेमात माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम यांच्या घरावर सीबीआयचा पडलेला छापा आणि ताब्यात आलेली बेहिशेबी संपत्ती या घटनेला जसेच्या तसे सिनेमात चित्रित करण्यात आले आहे. याच कारणामुळे ‘स्पेशल छब्बीस’ रिअल लाइफ टू रील लाइफ सिनेमा आहे.

80 च्या दशकात देशात एक खोटी सीबीआय गँग होती. श्रीमंत आणि भ्रष्ट नेत्यांना ही टोळी लुटायची. भ्रष्टाचाराच्या बाजारात सगळ्यांचेच हात बरबटलेले असल्याने कोणत्याही उद्योगपती किंवा नेत्याने याविरोधात आवाज उठवला नाही. लुबाडल्याचे समजले तरी नेमकी किती संपत्ती घेऊन खोटे अधिकारी फरार झाले हे नेमके सांगणे त्यांनाही कठीण होते. या घटनांची त्या वेळी प्रचंड चर्चा झाली. मात्र अधिकृतरीत्या कोणीही तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आले नाही. बनावट छापे टाकून 80 च्या दशकात धुमाकूळ घातलेल्या गँग वर ‘स्पेशल छब्बीस’ हा सिनेमा आधारित आहे. यातील एक उच्चस्तरीय घटना म्हणजे सुखराम यांच्या घरावर सीबीआयचा पडलेला छापा. त्यांच्या घरातून 2.45 कोटी रुपये ताब्यात घेऊन बॅगांमध्ये भरून ठेवले होते.

बातमीवरून सुचली कथा
अक्षय कुमार एका मंत्र्याच्या घरी छापा टाकून 300 कोटी रुपये जप्त करतो. त्या वेळी मंत्र्याची पत्नी आणि मुलगी घरी असते. त्यांच्याकडे कोणतेही स्पष्टीकरण नसते. ‘सुखराम यांच्याबद्दलची बातमी वर्तमानपत्रात वाचल्यानंतर ही कथा सुचली,’ असे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी सांगितले.