आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Screening Of Film Pompii Was Attented By Bollywood At Cinemax,Versova

‘पॉम्पे’च्या स्क्रिनिंगला पोहोचले बॉलिवूड स्टार्स, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पीव्हीआर पिक्चर्स आणि बॉक्स ऑफिस इंडियाच्या वतीने 'पॉम्पे' या हॉलिवूड सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग बुधवारी मुंबईत आयोजित केले होते. या स्क्रिनिंगला बी टाऊनमधील सेलेब्सला आमंत्रित करण्यात आले होते. मुंबईतील वर्सोवा सिनेमॅक्समध्ये हे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.
मिस जयपूर शमिका राजपूत, नितिन गोस्वामी, डिझायनर माया सिंह, निर्माता अनवर अली खान सर्वप्रथम स्क्रिनिंग स्थळी पोहोचले. त्यानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री तनीषा सिंह ब्लू ड्रेसमध्ये येथे पोहोचली, ब्राइट आउटडोर कंपनीचे योगेश लखानीसुद्धा हा सिनेमा बघायला पोहोचले होते. याशिवाय जॅकी भगनानी, नेहा शर्मा, राहुल जैन, दिशा चौधरी, ल्यूक कैनी, सतिश कौशिक., संगीत सिवन, शरवानी मुखर्जी, सिद्धार्थ खन्ना, अर्जुन बाजवा, गौरव चोप्रा, सिमोन आणि अर्जुन त्यागी हे कलाकारदेखील स्क्रिनिंगमध्ये दिसले.
सिनेमाची कथा आणि मुख्य कलाकार...
'पॉम्पे' एक पीरियड अॅक्शन सिनेमा आहे. मीलो नावाच्या एका पात्राभोवती सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले आहे. सिनेमातील मुख्य पात्र आपल्या प्रेयसीसाठी स्थानिक लोकांशी लढतो. मीलोची प्रेयसी कॅसियो एका श्रीमंत व्यापारीची मुलगी आस्ते.
या सिनेमात किट हॅरिंग्टन मुख्य भूमिकेत असून त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत एमिली ब्रोईंग आहे. पॉल एंडरसन यांनी सिनेमा दिग्दर्शित केला असून हा 3Dमध्ये रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा 'पॉम्पे'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...