आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटात एंट्री करणार 16 वर्षांची जान्हवी? आईने कसली कंबर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीदेवीची मुलगी जान्हवी सध्या आपले शिक्षण पूर्ण करत आहे, परंतु बॉलिवूडमध्ये आपल्या मुलीला लाँच करण्याची तयारी श्रीदेवीने मागील वर्षीच सुरु केली आहे.

फिटनेस आणि अभिनयाच्या बेसिक ट्रेनिंगसोबतच श्रीदेवीने जान्हवीसाठी एका स्टायलिस्टची नियुक्ती केली आहे. ही स्टायलिस्ट जान्हावीचे कॉलेज तसेच पार्टी आउटफिट्स तयार करते. या तयारीवरून असे दिसत आहे की, श्रीदेवी आपल्या मुलीला परफेक्ट बनवूनच लाँच करणार.

जान्हवी सध्या फक्त सोळा वर्षांची आहे. परंतु तिच्या स्टाइलची चर्चा सर्वत्र आहे. तिला सर्वात स्टायलिश स्टार डॉटर म्हणणे वावगे ठरणार नाही, कारण अवॉर्ड फंक्शन असो किंवा एखादा कार्यक्रम जान्हवी कपूर आपल्या आईबरोबर हमखास हजेरी लावताना दिसत आहे.