बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीने 'Hi Blitz' मासिकासाठी एक फोटोशुट केले आहे. श्रीदेवीने हे फोटोशुट मार्चच्या अंकासाठी केले असून यामध्ये ती खूपच शांत आणि सुंदर दिसत आहे. तिने या फोटोशुटमध्ये मयूर गिरोत्री (Mayyur Girotra)व्दारा डिझाइन केलेला ड्रेस परिधान केलेला आहे. त्यामध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. परंतु काही छायाचित्रे बघून असे जाणवते, की तिने हेअरस्टाइल आणि मेकअपकडे दुर्लक्ष केले.
मासिकामध्ये या ब्यूटी क्वीनने तिच्या छंदाविषयी सांगितले आहे. तिच्या सांगण्यानुसार, की तिला पेंटिंग करायला आवडते आणि ते पुन्हा सुरू करण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे. कारण काही दिवसांपासून ती कामात व्यस्त असल्याने तिचा हा छंद ती पूर्ण करू शकत नाहीये.
50 वर्षीय श्रीदेवी या नवीन फोटोशुटमध्ये खूपच आकर्षक आणि तरूण दिसत आहे. परंतु तिने मेकअप आणि हेअरस्टाइल केली असती तिच्या सौंदर्यात भर पडली असती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या फोटोशुटचे काही खास छायाचित्रे...