आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख म्हणतो, वितरकांच्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खान आणि मनोज कुमार यांच्यात सुरु असलेला वाद शमण्याची अद्यापही चिन्ह दिसत नाहीयेत. शाहरुखचा 'ओम शांति ओम' हा सिनेमा जपानमध्ये वादग्रस्त दृश्य न हटवता अलीकडेच प्रदर्शित करण्यात आला.

हे आहे संपूर्ण प्रकरण -

'ओम शांति ओम' हा सिनेमा भारतात 2007 साली रिलीज झाला होता. या सिनेमात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत होते. शाहरुख खान आणि इरोज इंटरनॅशनल हे या सिनेमाचे निर्माते होते. तर फराह खानने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमातील एका दृश्यात शाहरुखने त्याचा सहकलाकार श्रेयस तळपदेबरोबर मनोज कुमार यांच्या प्रमाणे आपल्या चेह-यावर हात ठेऊन त्यांची खिल्ली उडवली होती. या दृश्यावर मनोज कुमार यांनी आक्षेप नोंदवला होता. वाद वाढत असल्याचे बघून शाहरुख खानने ईमेल करुन मनोज कुमार यांची माफी मागितली होती आणि वादग्रस्त दृश्य सिनेमातून काढून टाकण्याचा शब्द दिला होता. मात्र तरीदेखील जपानमध्ये सिनेमा वादग्रस्त दृश्याबरोबर रिलीज करण्यात आला.

दोष माझा नाही, वितरकांचा आहे.... संपूर्ण बातमी वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...