आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • SRK’S Eid Bash: Aishwarya Rai’S Niece Navya Parties With Best Friend Aryan Khan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : अमिताभ यांची नात होती शाहरुखचा मुलगा आर्यनची स्पेशल गेस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने ईद आणि 'चेन्नई एक्स्प्रेस'ला मिळालेले यश सेलिब्रेट करण्यासाठी अलीकडेच मन्नतवर एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत शाहरुखने त्याच्या बी टाऊनमधील सर्व सेलिब्रिटी मित्रांना आमंत्रित केले होते. विशेष म्हणजे पार्टीत जितकेही पाहुणे दिसले त्यांना केवळ शाहरुखनेच आमंत्रित केले नव्हते, तर त्यापैकी काही पाहुण्यांना त्याचा मुलगा आर्यनने इन्वाईट केले होते.

आर्यनच्या मित्रांबद्दल बोलायचे झाल्यास अमिताभ बच्चन यांची नात नव्या त्याची चांगली मैत्रीण आहे. नव्याला आर्यनने खास या पार्टीसाठी इन्वाईट केले होते. या पार्टीत नव्या तिची आई श्वेता बच्चन नंदाबरोबर सामील झाली होती.

आर्यन आणि नव्या लंडनमधील एकाच शाळेत शिकतात. शिवाय शाळेच्या सहलीच्या छायाचित्रांमध्ये नव्या आणि आर्यन एकत्र दिसतात.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला आर्यन आणि नव्याची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत...