आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • SRK's Special Bash For Iftaar, AbRam & Chennai Express In Dubai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुबईत आज रंगणार शाहरुखची इफ्तार पार्टी, सलमानलासुद्धा मिळाले आमंत्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता शाहरुख खानकडे सध्या सेलिब्रेशनसाठी अनेक कारणं आहेत. पहिली आनंदाची गोष्ट म्हणजे शाहरुखचा तिसरा मुलगा अबराम आता दोन महिन्यांचा झाला आहे. प्री-मॅच्युअर्ड जन्माला आल्यामुळे अबरामची तब्येत नाजूक होती. मात्र आता हळूहळू त्याची तब्येत ठिक होत आहे. याशिवाय शाहरुखच्या खांद्याला झालेली दुखापतसुद्धा आता बरी झाली आहे.

'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाचे प्रमोशनही शाहरुखच्या मनाप्रमाणे होत आहे. डान्स रिअँलिटी शो, स्टॅण्डअप कॉमेडी शो आणि सिरिअल्स, जिथे तिथे शाहरुख आपल्या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतोय. शाहरुखने आपल्या सिनेमाचे प्रमोशन मुंबईपासून ते भोपाळपर्यंत केले. याशिवाय आता ईद सुद्धा जवळ आली आहे. रमजानच्या या महिन्यात शाहरुखचा कट्टर शत्रू असलेला सलमान त्याचा पुन्हा एकदा मित्र झाला आहे. पाच वर्षे जुने शत्रुत्व विसरुन या दोघांमध्ये आता मैत्रीचे संबंध निर्माण झाले आहे.

या सर्व चांगल्या गोष्टी होत असल्यामुळे शाहरुखने इफ्तार पार्टी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. इफ्तार पार्टीच्या निमित्ताने शाहरुख जंगी सेलिब्रेशन करणार आहे. एक खास गोष्ट म्हणजे ही इफ्तार पार्टी शाहरुखच्या मन्नतवर होणार नसून त्याच्या दुबईतील आलिशान घरी होणार आहे.