आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराध्याला झगमगाटापासून दूरच ठेवणार; बच्चन दांपत्याला मुलीसाठी सेलिब्रिटी स्टेटस नकोसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऐश्वर्या ही एक सुपरमॉम असून आराध्याची आई या नात्याने ती खूप काळजी घेते, अशी प्रतिक्रिया अभिषेक बच्चनने व्यक्त केली. एवढेच नाही तर आराध्याला प्रसिद्धीच्या झगमगाटापासून कायम दूर ठेवून तिचे संगोपन करायचे आहे, अशी इच्छा ‘पा’ अभिषेक बच्चनने व्यक्त केली आहे.
पीटीआयशी बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला की, आराध्याला बॉलीवूडच्या दिखाव्यापासून दूर ठेवण्याचे आम्ही दोघांनी ठरवले असून आनंदी आणि निरोगी वातावरणात तिला वाढवायचे आहे.’ माध्यमांनी सेलिब्रेटीजच्या मुलांचे फोटो छापताना किंवा दृश्ये दाखवताना जबाबदारीचे भान राखण्याचे आवाहन अभिषेक बच्चनने केले आहे.
18 व्या वर्षी पहिल्यांदा पाहिले फिल्म मॅगझीन : आम्ही लहान होतो तेव्हा माध्यमांचे प्रमाण नगण्य होते. त्यामुळे आमचे आई-वडील सेलिब्रिटी असूनही या जगातला झगमगाट आमच्यापर्यंत पोहोचला नाही. इतकंच नाही तर वयाच्या 18 व्या वर्षी प्रथम फिल्म मॅगझीन हातात घेतल्याचे अभिषेकने सांगितले.

स्लाइडला क्लिक करुन वाचा, पुढील वर्षी जोडी चित्रपटात