आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार गिल्ड अवॉर्ड्समध्ये जमली बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जानेवारी हा महिना बॉलिवूडमध्ये अनेक अवॉर्ड्सच्या नावी राहिला. पहिले स्क्रिन अवॉर्ड्स, त्यानंतर फिल्मफेअर अवॉर्ड्सचे नॉमिनेशन आणि आता स्टार गिल्ड अवॉर्ड्स. यावरुन तुम्ही अंदाज बांधू शकता, की या महिन्यांत बॉलिवूड स्टार्स आपल्या सिनेमांच्या शुटिंगव्यतिरिक्त या अवॉर्ड फंक्शन्समध्ये किती बिझी असतील.
स्टार गिल्ड अवॉर्ड्सविषयी बोलायचे झाल्यास, हा सोहळादेखील भव्यदिव्य होता. एकीकडे करीना आणि सोनाक्षीने रेड कार्पेटवर चारचाँद लावले तर दुसरीकडे शाहरुख खान आणि सलमान खान पुन्हा एकदा गळाभेट घेताना दिसले.
या कार्यक्रमात शाहरुख एकटा आला होता, तर सलमान त्याचा भाऊ अरबाज खान, बहीण अर्पिता आणि आगामी 'किक' या सिनेमातील को-स्टार जॅकलिन फर्नांडिससह येथे दिसला. या कार्यक्रमात करीना सिल्व्हर आणि गोल्डन रंगाच्या गाऊनमध्ये दिसली तर सोनाक्षी ब्लॅक टाइट ड्रेसमध्ये नजरेस पडली. दीपिका पदुकोण शॉर्ट टॉप आणि लाँग स्कर्टमध्ये होती. यावेळी ती 'गुंडे' फेम अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह यांची कंपनी एन्जॉय करत होती.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला स्टार गिल्ड अवॉर्ड्स सोहळ्याची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा या सोहळ्यात सामील झालेल्या ग्लॅमरस सेलिब्रिटींची खास झलक...