आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई नुकताच स्टारडस्ट अवॉर्ड सोहळा पार पडला. फिल्मफेअर पुरस्कारापाठोपाठ स्टारडस्ट पुरस्कार सोहळ्यातही अभिनेत्री विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला. ‘अग्निपथ’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (ड्रामा) पुरस्कार हृतिक रोशनला मिळाला. ‘बर्फी’साठी प्रियंका चोप्राचा तर ‘इंग्लिश विंग्लिश’साठी श्रीदेवीला विशेष पुरस्कार देण्यात आला, तर ‘रावडी राठौर’मधील दणकेबाज अॅक्शनसाठी अक्षय कुमारचाही सन्मान करण्यात आला. ‘जब तक है जान’साठी अनुष्का शर्माला सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 'अग्निपथ'मधील कांचाच्या भूमिकेसाठी संजय दत्तला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार देण्यात आला. येत्या 10 फेब्रुवारीला हा अवॉर्ड सोहळा छोट्या पडद्यावर प्रसारित होणार आहे.
या अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झालेल्या बी टाऊन सेलेब्सची खास झलक आम्ही तुम्हाला छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा स्टारडस्ट अवॉर्ड सोहळ्याची क्षणचित्रे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.