आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:ऋतिकला बघायला हॉस्पिटलमध्ये पोहोचले गौरी खानसह अनेक सेलेब्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशनवर रविवारी दुपारी हिंदुजा रुग्‍णालयात मेंदूची शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. ही एक एन्‍डोस्‍कोपी शस्‍त्रक्रिया आहे. त्‍याच्‍या मेंदुमध्‍ये रक्ताची गाठ तयार झाली होती. ती शस्‍त्रक्रि‍येद्वारे काढण्‍यात आली. सुमारे तासभर ही शस्‍त्रक्रिया चालली. शस्‍त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्‍याची पत्नी सुझान ऑपरेशन थिएटरच्‍या बाहेर उभी होती. ऋतिक आता धोक्‍याबाहेर असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्‍याला आता 48 तासांसाठी रुग्‍णालयात रहावे लागणार आहे. त्‍यानंतर सुटी देण्‍यात येईल. घरी गेल्‍यानंतरही काही काळ त्‍याला पूर्णपणे विश्रांती घ्‍यावी लागणार आहे.
ऋतिकच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी बी टाऊनमधील त्याचे मित्र हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. संजय कपूर, गौरी खान, उदय चोप्रा, राजपाल यादव, कुनिकासह अनेक सेलिब्रिटींनी ऋतिकची भेट घेतली.
बघा छायाचित्रे...