आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्टार मुल-मुली जन्मताच सेलिब्रिटी बनून जातात. त्यामुळे स्टार आईवडील मुलांना मीडियाच्या लाईमलाईटपासून दूर ठेवण्याचा अतोनात प्रयत्न करताना दिसतात. आता किंग खान शाहरुखनेसुद्धा असेच काही तरी केले आहे. शाहरुखने बॉलिवूड आणि मीडियापासून दूर ठेवण्यासाठी मुलगा आर्यनला लंडनला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन सध्या मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. मात्र आता लवकरच तो लंडनला रवाना होणार आहे. आर्यनच्या शाळेतील एकाने ही बातमी वा-यासारखी पसरवली आहे, की आर्यन लवकरच ही शाळा सोडणार आहे. आपल्या स्टारडममुळे मुलांसमोर अडचणी निर्माण होऊ नये म्हणून शाहरुखने आर्यनला भारतात न ठेवता आता लंडनला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शाहरुखने लंडनमधील नामांकित सेवेनोक्स या शाळेत अॅडमिशन करुन दिले आहे. ही शाळा सेंट्रल लंडनपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.
शाहरुख नेहमीच सुटी घालवण्यासाठी आपल्या कुटुंबाबरोबर लंडनला जात असतो. येत्या सप्टेंबरमध्ये आर्यन लंडनला रवाना होणार आहे. काही वर्षांनी मुलगी सुहानालाही लंडनला पाठवण्याचा शाहरुख आणि गौरीचा विचार आहे.
'आप हैं तो स्टार हैं' : चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे शाहरुख झाला किंग ऑफ बॉलिवूड !
PHOTOS : शाहरुख-अनुष्काचे लव्ह इन लंडन
काजोल-शाहरुख पुन्हा एकत्र दिसणार
अक्षयने थेट साधला शाहरुख आणि सलमानवर निशाणा !
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.