आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लीक झाली 'जिस्म 2'ची कहाणी, पोर्न स्टारच्या भूमिकेत सनी लियोन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या शुक्रवारी पोर्न स्टार सनी लियोनचा 'जिस्म 2' हा पहिला बॉलिवूड सिनेमा रिलीज होत आहे. या चित्रपटाची कहाणी लीक झाली आहे. या चित्रपटात सनी पोर्न स्टारच्या भूमिकेतच झळकणार आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'जिस्म 2'ची कहाणी काहीशी अशी आहे. सनी आपल्या नव-याबरोबर सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे. मात्र त्याचदरम्यान तिच्या नव-याची हत्या होते. नव-याच्या हत्या झाल्यानंतर सनीसमोर संकटाचा डोंगर उभा राहतो. आपल्या नव-याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सनी पोर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवते. सनी पोर्न इंडस्ट्रीतील नावाजलेली पोर्न स्टार बनते.
इंटेलीजेंस हेडच्या भूमिकेत असलेला अरुणोदय सिंग सनीला रणदीप हुड्डाबरोबर जवळीक वाढवायला सांगतो. रणदीप एक वॉन्टेड दहशतवाद्याच्या भूमिकेत आहे. या मोबदल्यात सनी आपल्या नव-याच्या खुन्याचा शोध घेण्यासाठी अरुणोदय सिंगबरोबर एक डील करते. चित्रपटात शेवटी रंजक वळण येते. सनीला शेवटी तिच्या नव-याचा खुनी रणदीपच असल्याचे समजते. मात्र तोपर्यंत ती रणदीपच्या प्रेमात पडली असते. शेवटी सनी आपल्या नव-याच्या खुन्याला शिक्षा मिळवून देणार की नाही, हे आपल्याला 'जिस्म 2'मध्ये पाहायला मिळणार आहे.