आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Strict Laws Necessary For Stopping Crime Against Women, Karina Kapoor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कायदे कठोर हवेत, करिना कपूरचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना थांबवण्यासाठी सध्याचे कायदे अधिक कठोर केले पाहिजेत. व्यवस्थेत बदलही करायला हवा, असे मत बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूरने व्यक्त केले.


छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर ती म्हणाली की, सध्या देशात महिलांसाठी सुरक्षित वातावरण नाही. देशातील युवा वर्ग हा प्रचंड संतापलेला आहे. त्यामुळे सध्या असलेल्या कायद्यात बदल करायला हवा. छोट्या-छोट्या गावात अत्याचाराच्या घटना या सातत्याने घडतात. आता याचे लोण मुंबईत पोहोचले आहे. बलात्काराच्या घटना देशभरात घडत आहेत. अनेकदा अशा घटना घडूनही त्या उजेडात येत नाहीत. याचे कारण म्हणजे पीडित महिला किंवा तरुणी बदनामीच्या भीतीने समोर येत नाहीत. महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढल्यास अशा घटनांना काही प्रमाणात आळा बसू शकेल, असेही ती म्हणाली.