आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subhash Ghai Returns With Kaanchi Starring Newbie Mishti

सुभाष घईंच्या 'कांची'मध्ये झळकणार नवा चेहरा, 25 एप्रिलला होणार रिलीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचे शोमॅन सुभाष घई कमबॅक करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आगामी 'कांची' सिनेमाचे स्टार लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमात ऋषी कपूर, मिथून चक्रवर्ती, कार्तिक आर्यन, चंदन रॉय आणि ऋषभ सिन्हा मेन लीडमध्ये आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना ब्रेक देणा-या सुभाष घई यांच्या या सिनेमातूनसुद्धा एक नवीन चेहरा आपले नशीब आजमावणार आहे. या नवोदित अभिनेत्रीचे नाव आहे मिष्ठी.
आपल्या सिनेमाद्वारे मिष्ठीला लाँच करत असलेल्या सुभाष घई यांनी पोस्टरवरसुद्धा तिचाच चेहरा ठेवला आहे. या सिनेमाकडून त्यांना ब-याच अपेक्षा आहेत. मुक्ता आर्ट्स बॅनरखाली तयार झालेल्या या सिनेमाला इस्माइल दरबार यांनी संगीत दिले आहे. हा सिनेमा गेल्यावर्षी 15 ऑगस्टला रिलीज होणार होता. मात्र काही कारणास्तव याची रिलीज डेट पुढे सरकली आणि आता 25 एप्रिलला सिनेमा रिलीज होणार आहे.
'कांची'ची कहाणी...
सुभाष घईंच्या 'कांची' सिनेमाची कहाणी अशा एका तरुणीची प्रेरणादायक कथा आहे, जी भ्रष्टाचाराविरोधात लढा देते.
सुभाष घई यांना का म्हटले जाते शोमॅन आणि काय आहे त्यांच्या सिनेमांच्या यशामागचे गुपित, जाणून घ्या पुढील स्लाईडमध्ये...